झाडांचे संवर्धन आणि संगोपन गरजेचे : शेर्ली पप्पू : फिनिक्स पब्लिक रेसिडेंसिअल स्कुलमध्ये वनमहोत्सव साजरा

Ravindra Jadhav
झाडांचे संवर्धन आणि संगोपन गरजेचे : शेर्ली पप्पू : फिनिक्स पब्लिक रेसिडेंसिअल स्कुलमध्ये वनमहोत्सव साजरा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 15 ( प्रतिनिधी) : पर्यावरण अबाधित ठेवायचे असेल तर झाडांचे संवर्धन आणि संगोपन गरजेचे आहे, असे बँक ऑफ इंडिया,मराठा मंडळ आवार शाखेचे वरीष्ठ व्यवस्थापक शेर्ली पप्पू म्हणाले.

फिनिक्स पब्लिक रेसिडेंसिअल स्कुल, होनगा यांच्यावतीने स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शेर्ली पप्पू यांनी उपरोक्त विचार मांडले.

प्रारंभी बँक ऑफ इंडिया,मराठा मंडळ आवार शाखेचे वरीष्ठ व्यवस्थापक शेर्ली पप्पू, चार्टर्ड अकाऊंटंट आणि फिनिक्स पब्लिक रेसिडेंसिअल स्कुलचे माजी विद्यार्थी दीप्ती जैन व नोएल गोले या मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर वनमहोत्सव कार्यक्रम पार पडला. मान्यवरांनी वृक्ष रोपटे लावून कार्यक्रमाला चालना दिली.

चार्टर्ड अकाऊंटंट आणि फिनिक्स पब्लिक रेसिडेंसिअल स्कुलचे माजी विद्यार्थी दीप्ती जैन व नोएल गोले यांनी झाडे लावा, झाडे जगवा चा संदेश दिला.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डेव्हिड अब्राहम, शिवलाल कलाल, शिवाप्पा धम्मनगी, रामेश्वरी छावरीया, सौम्या बरनट्टी, अरुण कांबळे, महांतेश गवी, सुनील देसाई, गणेश गोंधळी यासह अन्य शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.

महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी एमएलसी विवेकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article