Ad imageAd image

सर्वसामान्य म्हणतात, ‘ सरावलेल्या हातांना वेळीच बेड्या ठोका ‘ : एकाच रात्री दोन तालुक्यात चोरी : पळविले देवीचे दागिने

Ravindra Jadhav
सर्वसामान्य म्हणतात, ‘ सरावलेल्या हातांना वेळीच बेड्या ठोका ‘ : एकाच रात्री दोन तालुक्यात चोरी : पळविले देवीचे दागिने
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी कंग्राळी खुर्द ( बेळगाव तालुका) येथील श्री लक्ष्मी मंदिरात चोरी केली.
चोरट्यांनी देवीचे मंगळसूत्र, एक चांदीचा किरीट व चांदीचा हळदी कुंकू करंडा आदी ऐवज लांबविला.

याच रात्री गोकाकमध्येही चोरट्यांनी हात साफ केला. मोबाईलचे दुकानाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी दुकानातील किंमती मोबाईल चोरून नेले.
हे चोरटे नजीकचा बार फोडून रोकड लांबविण्यासाठी आले होते. मात्र, चोरी करण्यास बारमध्ये शिरलेल्या चोरट्यांच्या हाताला काहींच न लागल्याने त्यांनी त्याच रस्त्यावरील मोबाईलचे दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरून नेले.

दोन्ही घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आल्या. मंदिरात डल्ला मारून देवीचे मंगळसूत्र आणि इतर ऐवज लांबविल्याचे कळताच भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. यासंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.                गोकाक येथील मोबाईलदुकानात झालेल्या चोरी प्रकरणी गोकाक शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मध्यंतरी चोरी आणि घरफोडीच्या घटना थोड्या थंडावल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. सरावलेल्या हातांना वेळीच बेड्या ठोकाव्या, अन्यथा माजलेल्या चोरट्यांकडून आणखीन काही मंदिरे आणि घरांचे कडी-कोयंडे उचकटले जातील, असे सर्वसामान्य लोकांकडून सांगितले जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article