Ad imageAd image

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यानीवेळेवर उपस्थित राहावे : बैठकीत केले गेले आवाहन

Ravindra Jadhav
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यानीवेळेवर उपस्थित राहावे : बैठकीत केले गेले आवाहन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदीर सभागृहात झालेल्या बैठकीत हुतात्मा दिन गांभीर्याने आचरण्याचे ठरविण्यात आले.
1 जून रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे कन्नडसक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समस्त कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी 4 जून नंतर व्यापक बैठक घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 4 जून नंतर आयोजिण्यात येणाऱ्या बैठकीविषयी आपली मते मांडली.

बैठकीला कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एम. जी. पाटील, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, मनोज पावशे, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, एल. एस. होनगेकर, डी- बी. पाटील, नारायण कालकुंद्री, मनोहर संताजी, एल. आर. मासेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article