Ad imageAd image

पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बानियांग यांनी केले स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे उदघाटन

Ravindra Jadhav
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बानियांग यांनी केले स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे उदघाटन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 14 ( प्रतिनिधी) : युवकांनी व्यसनापासून दूर राहून शारीरिक सदृढतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बानियांग म्हणाले.
केळकरबाग येथे सुरू करण्यात आलेल्या स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. संचालक रमेश पावले व संभाजी पावले यांच्या हस्ते पाहुण्यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व गदा भेट देऊन स्वागत करण्यात आले. संभाजी पावले यांनी स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेची माहिती दिली.

स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे उद्घाटन प पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बानियांग यांच्या हस्ते फीत सोडून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी मिस्टर एशिया सुनिल आपटेकर, विकास कलघटगी उपस्थित होते.

मिस्टर एशिया सुनिल आपटेकर यांनी व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी विनायक पावले, विक्रम पावले, भूषण धामणेकर, विजय बोंगाळे, राजू मोरे, सुरेश धामणेकर, रमाकांत कोंडूसकर व चंद्रकांत कोंडूसकर, दत्ता जाधव, भरत पाटील, राजेंद्र हंडे, महेश कुगजी, माया पावले, आरती पावले, प्रतिभा पावले, पूनम पावले, भाग्यश्री धामणेकर आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article