बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीने राबविले सावगाव तलाव परिसरात स्वच्छता अभियान

Ravindra Jadhav
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीने राबविले सावगाव तलाव परिसरात स्वच्छता अभियान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7news) :  बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीने  सावगाव तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

नुकताच गणेशोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश मूर्तीं विसर्जन सोहळाही तितक्याच धामधुमीत पार पडला.
बेनकनहळी, सावगाव, गणेशपुर, नानावाडी , मंडोळी , हंगरगा, सुरेश अंगडी रोड, बोकमुर, बेळगुंदी परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन सावगाव तलावात करण्यात केले.
विसर्जन सोहळ्यानंतर विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच सावगाव तलावात प्लास्टिक व निर्माल्य पसरलेले होते.

बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी याची दखल घेत पुढाकार घेऊन परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
शनिवारी सकाळी सावगांव गावातील धरणाजवळील परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानमध्ये बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्षासह एमएलआयआरसीचे मेजर संतोष, मेजर विक्रम व ले. कर्नल भरत राव व त्यांची रेस्क्यू टीम, बेनकनहळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सायराबानु हुक्केरी व पंचायतचे सेक्रेटरी प्रताप मोहीते व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांनी व गावातील अनेक युवकांनी सहभाग घेतला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article