येळ्ळूर येथील शिवसेना चौकातील ‘ त्या ‘कोसळलेल्या गटारीचे पावसाळ्याआधी बांधकाम करावे : नागरिकांनी केलीय ग्रामपंचायतीकडे मागणी

Ravindra Jadhav
येळ्ळूर येथील शिवसेना चौकातील ‘ त्या ‘कोसळलेल्या गटारीचे पावसाळ्याआधी बांधकाम करावे : नागरिकांनी केलीय ग्रामपंचायतीकडे मागणी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव : शिवसेना चौक, येळ्ळूर येथील कोसळलेल्या गटारीचे बांधकाम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली गेली आहे.
ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सदर गटारीचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

येळ्ळूर येथील शिवसेना चौकाजवळील मुख्य रस्त्या शेजारील जुनी गटार कोसळली आहे. गटाराचे दगड -माती कोसळली असून गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असून प्रचंड गाळ साचला आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा न होता ते तुंबून अस्वच्छतेसह दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे. या गटारीच्या बांधकामासंदर्भात गेल्या 5 महिन्यात 3 वेळा निवेदन देऊनही फक्त आश्वासनापालिकडे काहीच मिळालेले नाही. या गटार बांधणीकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर गटारीची वेळीच साफसफाई करून गटारीचे व्यवस्थित बांधकाम न केल्यास ऐन पावसळ्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.
याचा गांभीर्याने विचार करून ग्राम पंचायतीने शिवसेना चौकातील कोसळलेल्या गटारीची तात्काळ साफसफाई करून बांधकाम करावे अन्यथा आपल्याला वेगळे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article