बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून चेतनसिंग राठोड यांनी स्वीकारला पदभार

Ravindra Jadhav
बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून चेतनसिंग राठोड यांनी स्वीकारला पदभार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून चेतनसिंग राठोड यांनी पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य दिले जाईल, असे चेतनसिंग राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना म्हटले आहे.

बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार यांची अन्यत्र बदली झाल्याने चेतनसिंग राठोड यांनी त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
हावेरीत असताना उत्तर विभागात काम करण्याचा अनुभव आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य दिले जाईल. गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यास केला जाईल, असे सांगताना
लोकहिताच्या दृष्टीने लोकाभिमुख पोलीस म्हणून काम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे, पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन आयजीपी चेतनसिंग राठोड म्हणाले.
मावळते आयजीपी विकासकुमार विकास यांनी चेतनसिंग राठोड यांच्याकडे पदभार सोपवला. यावेळी बेळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रुती बसापुरे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article