शतरंज ‘ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे बेळगावात आयोजन

Ravindra Jadhav
शतरंज ‘ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे बेळगावात आयोजन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने ‘ शतरंज ‘ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रेल्वे ओव्हर ब्रिज नजिकच्या मराठा मंदिर येथे शनिवार दिनांक 28 आणि रविवार दिनांक 29 डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला रोख 50 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकून 3 लाख 20 हजार रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथचे अध्यक्ष निलेश पाटील, रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथचे सचिव भूषण मोहिरे, रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथचे इव्हेंट को-चेअरमन जगदीश काजगार, स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी नागराज शेट्टी, बुद्धिबळ ज्येष्ठ प्रशिक्षक गिरीश बाचीकर ( एन. ए) तसेच बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आकाश मडीवाळर हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अधिक माहितीसाठी गिरीश बाचीकर, मोबाईल क्रमांक 8050160834 अथवा आकाश मडीवाळर, मोबाईल क्रमांक 8310259025 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article