Ad imageAd image

सतीशअण्णा चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईचा हरिकृष्णन ठरला ‘सतीशअण्णा चषकाचा ‘ मानकरी : मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेखने मिळविला दुसरा तर गोव्याच्या वाज इथेन याने तिसरा क्रमांक

Ravindra Jadhav
सतीशअण्णा चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईचा हरिकृष्णन ठरला ‘सतीशअण्णा चषकाचा ‘ मानकरी : मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेखने मिळविला दुसरा तर गोव्याच्या वाज इथेन याने तिसरा क्रमांक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : सतीशअण्णा फॅन्स क्लबच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित सतीशअण्णा चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईचा हरिकृष्णन ‘ सतीशअण्णा चषकाचा’ चा मानकरी ठरला.

हरिकृष्णन ए आर यांने 2242 रेटिंग वर एस 18 प्रकारात 8 पूर्णांक 5 या गुणाने विजयी होत पहिला क्रमांक मिळवत  सतीशअण्णा चषकावर नाव कोरले. त्याला एक लाख रुपये रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेख यांनी 2236 रेटिंग वर एस 18 प्रकारात 8 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला. त्याला रोख रक्कम 50 हजार रुपये, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर गोव्याच्या वाज इथेन याने 2282 रेटिंग वर अंडर 14 प्रकारात 8 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला. त्याला 25 हजार रुपये रोख, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बेळगावच्या अनिरुद्ध दासारी याने बेस्ट बेळगाव हा किताब पटकाविला.
या स्पर्धेत साईप्रसाद कोकाटे याने 7 गुणांसह 20 वा क्रमांक पटकावित यश संपादन केले. अद्वैत जोशीने 8 वर्षांखालील गटात दुसरा क्रमांक तर साईनाथ देसूरकरने या गटात पाचवा क्रमांक मिळविला. पारीशर्थ एस. एम. याने या गटात 7 वा क्रमांक पटकाविला. माधव गुड्डण्णावरने 10 वा, शरथ पावदादने 13 वा, सारा कागवाडने 10 वर्षांखालील गटात 13 वा क्रमांक, अंशुमान शेवडेने 12 वर्षांखालील गटात दुसरा, रितेश मुचंडीकरने 8 वा, गितेश सागेकरने 11 वा, अर्पिता माडीवालेने 12 वा क्रमांक पटकाविला.

या विजेत्या स्पर्धकांना काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेसाठी प्रमुख आरबिटर म्हणून पौर्णिमा उपावलकर, सक्षम जाधव, भरत चौगुले, करण पाटील, दीपक वैचळ, विपीन यादव यांनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी करण्याकरिता बुद्धीबळ प्रशिक्षक प्रशांत अनवेकर, निलेश भंडारी, दत्तात्रय राव, श्रेयस कुलकर्णी,
महेश निट्टुरकर, अजय यासह इतरांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article