Ad imageAd image

मराठा मंदिरकडून ‘सीएं ‘चा सन्मान

Ravindra Jadhav
मराठा मंदिरकडून ‘सीएं ‘चा सन्मान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी) : मराठा मंदिर, बेळगाव या संस्थेच्यावतीने नव्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांचा सन्मान करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमात नव्याने पात्र ठरलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अभ्युदय एस. पाटील, तेजस्विनी कंग्राळकर, शिवानंद मंडोळकर, अंजली अष्टेकर, जीवन शाहापूरकर, स्वाती गावडे, स्वप्नील पाटील यांचा सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, सचिव बाळासाहेब काकतकर, लक्ष्मणराव सैनुचे, लक्ष्मण होनगेकर, विश्वास घोरपडे, शिवाजी हांगीरगेकर, चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे आणि अनिल जांबोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे सचिव बाळासाहेब काकतकर यांनी स्वागत केले. मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी सीएंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत गुंडकल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीएंनी यावेळी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article