बेळगाव ( bn7 news) : येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धा दिनांक 22 पासून सुरू होणार असून दिनांक 25 सप्टेंबर पर्यंत स्पर्धा चालणार आहे.
शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंगवर रिंक रेस तर आदर्श स्कूल रोड, वडगाव (ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ) येथे रोड रेस होणार आहे.
केरळ, महाराष्ट्र, गोवा, दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 हून अधिक स्केटिंग पटू या स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी सीबीएसई च्यावतीने 1 निरीक्षक, भारतीय रोलर महासंघटना यांच्या वतीने 18 ऑफिशियल, बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्यावतीने 20 मदतनीस व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल चे 45 शिक्षक काम पाहणार आहेत.
स्पर्धेचे उद्घघाटन पोलीस कमिशनर यडा मार्टिन मार्बन्यान्ग यांच्या हस्ते होणार असून यावेळी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक अमित घाटगे, प्रेरणा घाटगे , शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर, कर्नाटका रोलर स्केटिंग असोसिएशन चे सचिव इंदुधर सीताराम, उमेश कलघटगी, ज्योती चिडक,निखिल चिंडक, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर, इम्रान बेपारी, यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.