कॅपिटल वन एस. एस.एल.सी.व्याख्यामालेस प्रारंभ

Ravindra Jadhav
कॅपिटल वन एस. एस.एल.सी.व्याख्यामालेस प्रारंभ
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव : येथील ‘ कॅपिटल वन ‘ या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 16 व्या एस.एस.एल.सी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक सी.वाय. पाटील , मराठी विषयाचे व्याख्याते मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे बी एम.पाटील व युवराज पाटील उपस्थित होते.


व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आली. संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रास्ताविक भाषणात शिवाजीराव हंडे यांनी, ‘ विद्यार्थी वर्गाला उद्देशून आपल्या भावी आयुष्याची सुरुवात म्हणून या दहावीच्या परिक्षेला निर्भिडपणे सामोरे जाऊन नवीन जगात नवे ध्येय उराशी बाळगून पुढे वाटचाल करावी, असे मत व्यक्त केले.
सी. वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात, संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून विद्यार्थाना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. विशेषतः मागील वर्षीच्या शिबिरामध्ये भाग घेऊन 99.04% गुण प्राप्त केलेली विद्यार्थिनी प्रेरणा पाटील हिचे कौतुक करून तिचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व्हावं अशी आशा देखील यावेळी व्यक्त केली गेली.

 सदर कार्यक्रमास संस्थेचे व्हा.चेअरमन शाम सुतार, संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर,शरद पाटील लक्ष्मीकांत जाधव, संजय चौगुले , सदानंद पाटील, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मराठी विषयाच्या व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article