बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे.
रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 ते रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 या कालावधीत प्रत्येक रविवारी सकाळी 8.15 ते दुपारी 12 या वेळेत व्याख्यानमाला भरविण्यात येणार आहेत.
सदर व्याख्यानमालेचे उदघाटन रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता ज्योती महाविद्यालयातील सभागृहात संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी ही माहिती दिली आहे.
एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमालेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
विषय : मराठी
रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024
सकाळी 8.15 ते 12.00
विषय : गणित
रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024
सकाळी 8.15 ते 12.00
विषय : इंग्रजी
रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024
सकाळी 8.15 ते 12.00
विषय : कन्नड
रविवार दिनांक 5 जानेवारी 2025
सकाळी 8.15 ते 12.00
विषय : विज्ञान
रविवार दिनांक 12 जानेवारी 2025
सकाळी 8.15 ते 12.00
विषय : समाज-विज्ञान
रविवार दिनांक 19 जानेवारी 2025
सकाळी 8.15 ते 12.00