नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 15 : मारीहाळ (ता. बेळगाव) येथील स्व. नागाप्पा मिसाळे प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी शिक्षकांसाठी जीवनगौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असून यावर्षीचे पुरस्कार वितरण 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी पात्र शिक्षकांनी येत्या 31 ऑगस्ट अखेर आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. डी. एन. मिसाळे यांनी केले आहे.
सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्यासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असणार आहे.
शिक्षकांना कमीत कमी वीस वर्षाचा अनुभव अपेक्षित असून जीवनगौरव पुरस्कारासाठी वय ७५ पेक्षा अधिक असावे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुढील पत्त्यावर पात्र शिक्षकांनी आपली माहिती पाठवावी. डॉ. डी.एन.मिसाळे प्लॉट नंबर 19, पी.अण्ड टी.कालनी, हनुमान नगर सेकंड स्टेज, बेळगाव मोबा. 9480398025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article