बेळगाव : सिलेंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
बेळगाव तालुक्यातील सुळगा हिंडलगा येथील शंकर गल्लीतील येथे शनिवार दिनांक 18 मे रोजी ही घटना घडली होती.
या घटनेत कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय 65) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील ( वय 61) हे गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या या दाम्पत्याला उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना खाजगी इस्पितळात हलविण्यात आले होते. सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या दाम्पत्याचा शुक्रवारी 24 रोजी मृत्यू झाला.
रात्री रेग्युलेटर मधून गॅस गळती होऊन घरात गॅस पसरला होता. झोपेत या दाम्पत्याला हे कळलेच नाही. पहाटे उठून स्वयंपाक घरातील दिवा लावण्यासाठी बटन दाबताच आगीचा भडका उडाला आणि ती दुर्घटना घडली होती.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@