पश्चिम बंगालचा शरीरसौष्ठवपटू अंकुन गुहा ठरला ज्युनियर मिस्टर इंडिया किताबाचा मानकरी : आसामच्या दिलीप दिओरीने पटकाविला मास्टर मिस्टर इंडिया टायटल : बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनीही मारली बाजी

Ravindra Jadhav
पश्चिम बंगालचा शरीरसौष्ठवपटू अंकुन गुहा ठरला ज्युनियर मिस्टर इंडिया किताबाचा मानकरी : आसामच्या दिलीप दिओरीने पटकाविला मास्टर मिस्टर इंडिया टायटल : बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनीही मारली बाजी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : ज्युनियर मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत पश्चिम बंगालचा शरीरसौष्ठवपटू अंकुन गुहा याने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडवत ‘ ज्युनियर मिस्टर इंडिया ‘ किताब पटकावला. तर आसामचा शरीरसौष्ठवपटू दिलीप दिओरी हा मास्टर मिस्टर इंडिया टायटलचा मानकरी ठरला.

कुचबिहार येथे इंडिअन बॉडी बिल्डिंग फेडरेशन आयोजित 57 वी कनिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. 13 राज्यातून जवळपास 97 शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेत बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनीही प्रशंसनीय बाजी मारली.
कर्नाटक राज्य संघातून खेळताना बेळगावच्या ऋतिक पाटील याने 65 किलो वजनी गटात तर सुजित शिंदे याने 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकं मिळविली. 60 किलो वजनी गटात बेळगावच्या यश हुल याने पाचवा क्रमांक मिळवला. कर्नाटक संघाचे नेतृत्व श्रीधर बारटक्के यांनी केले होते. 
बेळगावच्या या तिन्ही शरीरसौष्ठवपटूंना बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

55 किलो वजनी गटात आंध्र प्रदेशच्या शेख जाफर व अल्लू राजेश यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा, वेस्ट बंगालच्या राजदीप अधिकारी याने तिसरा, नॉर्थ बंगालच्या नतिशीलशरण याने चौथा तर वेस्ट बंगालच्या सुमित विश्वास याने पाचवा क्रमांक पटकाविला.
65 किलो वजनी गटात कर्नाटकाच्या प्रतीक दत्तात्रय पाटील यांने पहिल, वेस्ट बंगालच्या रोहित गोस्वामी व सोहन ठाकूर यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा, आंध्रप्रदेशच्या एस जयचंद्र याने चौथा तर वेस्ट बंगालच्या सागर पॉल याने पाचवा क्रमांक मिळविला.
60 किलो वजनी गटात आंध्र प्रदेशच्या पागोटी साठी याने पहिला, वेस्ट बंगालच्या विनय महात यांने दुसरा, उत्तर प्रदेशच्या रवीकुमार यांने तिसरा, वेस्ट बंगालच्या सतीश कुमार राऊत यांने चौथा तर कर्नाटकाच्या यश हूल याने पाचवा क्रमांक मिळविला.
70 किलो वजनी गटात वेस्ट बंगालच्या तुषार हलदर याने पहिला, आंध्र प्रदेशच्या लव्हेटी प्रसाद यांने दुसरा, वेस्ट बंगालच्या अंकुश पत्रा यांने तिसरा तर नॉर्थ बंगालच्या अनंतराव यांने चौथा क्रमांक मिळविला.
75 किलो वजनी गटात वेस्ट बंगालच्या अंकुन गुहा यांनी पहिला तर अभिजीत घोसे याने दुसरा क्रमांक मिळविला.
75 किलो हुन अधिक वजनी गटात कर्नाटकाच्या सुजित शिंदे यांने पहिला, वेस्ट बंगालच्या राघवेंद्र कुमार यांने दुसरा, आंध्रप्रदेशच्या रै सई सिद्धू व धम्मू गोपी चंदू यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा तर उत्तर प्रदेशच्या अमित वाण याने पाचवा क्रमांक मिळविला.
मास्टर मध्ये 40 ते 49 वयोगटात दिलीप देओरी या आसामच्या शरीरसौष्ठवपटूने पहिला, वेस्ट बंगालचा सौमिक सेन यांने दुसरा, वेस्ट बंगालच्या सुवजीत घोसे याने तिसरा, आंध्र प्रदेशच्या तुरला नूक्का राजू याने चौथा तर वेस्ट बंगालच्या सौरभ घोसे याने पाचवा क्रमांक मिळविला.
याच वयोगटात 90 किलो वजनी गटात वेस्ट बंगालच्या दिलीप रॉयने पहिला, झारखंडच्या प्रबिनचंद्र मोहोतो याने दुसरा तर वेस्ट बंगालच्या सौरभदास आणि डॉक्टर सौरभ गुहा यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळविला.
मास्टर मध्ये 60 वर्षावरील वयोगटात वेस्ट बंगालच्या रितेश सहा आणि उत्तम घोसे यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा, महाराष्ट्राच्या गिरीश दिवाकर पावडे यांने तिसरा, वेस्ट बंगालच्या इंद्रनील गांगुली यांने चौथा तर महाराष्ट्राच्या नितीन शाम चनरिया याने पाचवा क्रमांक मिळविला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article