Ad imageAd image

बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे अविनाश पोतदार यांचा वाढदिवस साजरा

Ravindra Jadhav
बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे अविनाश पोतदार यांचा वाढदिवस साजरा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 24 ( प्रतिनिधी) : बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांचा क्लब तर्फे 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे अविनाश पोतदार यांना शाल,श्रीफळ आणि गुलाबाचे रोपटे देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सर्व सभासदांनी अविनाश पोतदार यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. यापुढेही अविनाश पोतदार यांनी कार्यरत राहून क्लबची भरभराट करावी व क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्याचे कार्य करावे अशी इच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी दीपक पवार, अजित गरगट्टी , प्रकाश मिर्जी, संगम पाटील, बाळकृष्ण पाटील,अशोक नाईक, बबन देशपांडे, शरद पै, विजय पाटील, संजय सातेरी, सोमनाथ सोमनाचे, राजू लेंगडे, विवेक पाटील, रवी केतकर, धनराज गवळी, ओम प्रभ, समीर केशकामत, दयानंद हिरेमठ आदी सभासद उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article