Ad imageAd image

कर्नाटक राज्य समगार (चर्मकार) हरळय्या संघाच्या बेळगाव जिल्हा घटकाच्या अध्यक्षपदी भीमराव पवार यांची निवड : जिल्ह्यात संघटना बलिष्ठ करण्याचा घेण्यात आला सर्वानुमते निर्णय

Ravindra Jadhav
कर्नाटक राज्य समगार (चर्मकार) हरळय्या संघाच्या बेळगाव जिल्हा घटकाच्या अध्यक्षपदी भीमराव पवार यांची निवड : जिल्ह्यात संघटना बलिष्ठ करण्याचा घेण्यात आला सर्वानुमते निर्णय
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 20 ( प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य समगार (चर्मकार) हरळय्या संघाच्या बेळगाव जिल्हा घटकाच्या अध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंते भीमराव पवार यांची निवड करण्यात आली.

संजीव लोकापूर यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल फूड कॉर्नर येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघाच्या बेळगाव घटक अध्यक्षपदासाठी संतोष होंगल आणि सागर कित्तूर यांनी भीमराव पवार यांचे नाव सुचविले. त्याला प्रा. चंद्रकांत वाघमारे आणि हिरालाल चव्हाण यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर भीमराव पवार यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

पुढील बैठकीत जिल्हा समिती व तालुका समितीची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दौरे करून राज्य संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बेळगाव महामंडळाचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी, नवनिर्वाचित अध्यक्ष भीमराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात समगार हरळय्या संघाच्या बलिष्टीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी शंकर कांबळे, जी. बी. वाघमारे, चंद्रकांत चव्हाण, राजेंद्रकुमार रायमाने, संजय चौगुले, मल्लिकार्जुन तालिकोटी, वैष्णवी कांबळे यासह संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article