भारत विकास परिषदेतर्फे ” गुरु वंदना – छात्र अभिनंदन ” संस्कारक्षम अनोखा सोहळा अपूर्व उत्साहात

Ravindra Jadhav
भारत विकास परिषदेतर्फे ” गुरु वंदना – छात्र अभिनंदन ” संस्कारक्षम अनोखा सोहळा अपूर्व उत्साहात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ सोहळा चिंतामणराव शाळेच्या सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत विविध शाळांच्या 30 उत्कृष्ट शिक्षकांना प्रशस्तीपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 60 विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. सर्व शिष्यांनी आपल्या गुरूंना नतमस्तक होऊन वंदन केले व गुरूंनी त्यांना आशिर्वचन दिले.

प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. प्रांताध्यक्षा स्वाती घोडेकर यांनी परिषदेचे राष्ट्रीय प्रकल्प, सामाजिक कार्य तसेच आगामी उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. प्रा. अरुणा नाईक यांनी “गुरुवंदना” कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षकांना तसेच आदर्श विद्यार्थ्यांना आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. शुभांगी मिराशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. जया नायक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शहरातील के. एल्. एस्. स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालय, बालिका आदर्श विद्यालय, सरदार हायस्कूल, बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, ठळकवाडी हायस्कूल, एम् . व्ही. हेरवाडकर स्कूल, जी. जी. चिटणीस स्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, अमृता विद्यालय, संत मीरा इंग्लिश माध्यम स्कूल, महिला विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल, महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूल, व्ही. एम्. शानभाग हायस्कूल, एम्. आर. भंडारी स्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल, लिट्ल स्कॉलर्स हायस्कूल, गोमटेश मराठी माध्यम हायस्कूल, जोशी सेंट्रल स्कूल, माहेश्वरी अंधशाळा, मुक्तांगण विद्यालय, ज्ञान मंदिर इंग्लीश मिडीयम स्कूल, क्रां. संगोळी रायण्णा हायस्कूल, भारतीय विद्याभवन स्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल, सरस्वती हायस्कूल, चिंतामणराव हायस्कूल या शाळांमधून निवडलेले शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक, सचिव के. व्ही. प्रभू, डी. वाय. पाटील, प्राचार्य व्ही. एन्. जोशी, सुहास गुर्जर, डॉ. जे. जी. नाईक, एन्. बी. देशपांडे, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, सुहास गुर्जर, विजेंद्र गुडी, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, चंद्रशेखर इटी, पी. एम्. पाटील, गणपती भुजगुरव, विजय हिडदुग्गी, पी. जे. घाडी, ॲड. सचिन जवळी, विद्या इटी, प्रिया पाटील, ज्योती प्रभू, ज्योत्स्ना गिलबिले, निमंत्रित, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article