Ad imageAd image

बेनकनहळ्ळी प्राथमिक शाळेला आदर्श एसडीएमसी पुरस्काराने केले गेले सन्मानीत

Ravindra Jadhav
बेनकनहळ्ळी प्राथमिक शाळेला आदर्श एसडीएमसी पुरस्काराने केले गेले सन्मानीत
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेनकनहळ्ळी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला बेळगाव तालुक्यातील आदर्श एसडीएमसी पुरस्कार देऊन सन्मानीतत करण्यात आले.
गांधी भवन येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तीमठाचे शिवानंद स्वामीजी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ तसेच डाएट प्राचार्य बसवराज नलतवाड, क्षेत्र शिक्षणाधिकारी बेळगाव ग्रामीणचे एस.पी. दासप्पणावर, बीआरसी प्रमुख एम. एस. मेदार तसेच इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते, .

यावेळी तालुक्यातील वर्षभरामध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. ‘ यानंतर तालुक्यातील निवडक शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर बेनकनहळ्ळी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला आदर्श एसडीएमसी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी एसडीएमसी अध्यक्ष कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष वैजनाथ मोनापा पाटील तसेच इतर सर्व एसडीएमसी सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परशराम पिसाळे, उपाध्यक्ष गजानन पाटील, सचिव यल्लाप्पा देसुरकर, खजिनदार मोहन कांबळे तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
शाळेचा शिक्षक वर्ग, मुख्याध्यापिका एस. एम. मलकापूर, एच. के. बाळेकुंद्रीकर, एम. बी. बागवान, संभाजी पाटील, एम. एन. पाटील तसेच ईश्वर पाटील हेही यावेळी उपस्थित होते.

या शाळेच्या यशात तसेच विद्यार्थांच्या जडण घडणीत शाळेचे विज्ञान शिक्षक तसेच उपक्रमशील आणि कार्यतत्पर शिक्षक ईश्वर सातेरी पाटील (बेळवटी) यांच्या सेवा कार्याचा मोलाचा वाटा आणि एसडीएमसी व शिक्षकवर्गाचे प्रोत्साहन यामुळेच हा पुरस्कार शाळेला मिळाल्याचे कौतुकास्पद उदगार शाळेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांतून काढले जात आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article