मर्कंटाइलच्या स्वरसंध्या कार्यक्रमात घेणार दिग्गज भाग : बेळगावकरांना मिळणार गीत-संगीताची मेजवानी

Ravindra Jadhav
मर्कंटाइलच्या स्वरसंध्या कार्यक्रमात घेणार दिग्गज भाग : बेळगावकरांना मिळणार गीत-संगीताची मेजवानी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : गेली सोळा वर्षे सातत्याने महाराष्ट्रातील अनेक गायकांना व कलाकारांना बेळगावात आणून त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ‘ स्वरसंध्या ‘ च्या माध्यमातून करीत आहे.

यावर्षी सोसायटीच्या वतीने ज्ञानेश्वरी गाडगे आणि अनुष्का शिकतोडे या उदयोन्मुख कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे बेळगावकरांना गीत-संगीताची मेजवानीच उपलब्ध होणार आहे.

येत्या 21 व 22 जानेवारी रोजी रामनाथ मंगल कार्यालयात सायंकाळी स्वरसंध्या कार्यक्रम आयोजिण्यात आला असून या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री संजय मोरे यांनी ज्ञानेश्वरी गाडगे आणि अनुष्का शिकतोडे या दोन्ही गायकांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

ज्ञानेश्वरी गाडगे ही ठाण्यातील एका सामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाची मुलगी असून तिने आपल्या सुमधुर भजने आणि गवळणी द्वारा महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. हिंदी झी चॅनेल वरील सारेगम लिटल चॅम्प कार्यक्रमाची ती विजेती आहे. ती आठव्या इयत्तेत शिकत आहे.
अनुष्का शिकतोडे ही महाराष्ट्रातील हास्य जत्रा फेम असून तिचा जादुई आवाज घराघरात पोहोचला आहे. मूळची सोलापूरची असलेल्या अनुष्काने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असून ती संगीत विशारद आहे. अनेक स्टेज शो तिने गाजविले असून साथिया व मन के परिंदे हे तिचे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. ‘ सुर नवा ध्यास नवा ‘ मध्ये ती फायनलिस्ट आहे.

अशा प्रकारच्या या मातब्बर गायिकांना ऐकण्याची संधी बेळगावकरांना मर्कण्टाइल सोसायटीने उपलब्ध करून दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article