बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 6 व्या नॅशनल रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप- 2024 मध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी विशेष चमक दाखविली.
या चॅम्पियनशिपमध्ये 28 राज्यातील सुमारे1400 हून अधिक स्केटिंगपटू सहभागी झाले होते. यामध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटिंग पटूंनी 3 रौप्य आणि 2 कास्य पदके पटकविली.
स्पीड स्केटिंग प्रकारात जान्हवी तेंडुलकर हिने 1 रौप्य, 1 कांस्य, आर्या कदम ने 1 रौप्य, 1कांस्य तर सौरभ साळोखेने 1 रौप्यपदक मिळविले.
या स्केटिंगपटूंना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ यांचे मार्गदर्शन आणि डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म यांचे प्रोत्साहन लाभत आहे.