Ad imageAd image

बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धा : बेळगावसह बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग, हावेरीतील जलतरणपटूंनी घेतला होता भाग

Ravindra Jadhav
बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धा : बेळगावसह बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग, हावेरीतील जलतरणपटूंनी घेतला होता भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव (bn7news) : बेळगाव विभागस्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत बेळगावसह बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग, हावेरीतील जलतरणपटूंनी भाग घेतला होता.

गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये बेळगाव जिल्हा युवजन सेवा व क्रीडा खाते तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव महापालिकेचे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते जलतरण तलावाची पूजा व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी युवा सबलीकरण व क्रीडा अधिकारी एच श्रीनिवास, जायंट्स ग्रुप बेळगाव मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, सुनील जाधव, सतीश धनुचे, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार , विजया शिरसाठ व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत पुरुषांच्या गटात 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये स्मरण मंगळूरकर, स्वयं कारेकर व हर्षराज कोटी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक,
200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये स्मरण मंगळूरकर, वेदांत पाटील, प्रज्वल कोपर्डे यांनी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 100 मिटर बॅकस्ट्रोकमध्ये धवल हनमनावर, चिन्मय बागेवाडी,हर्षराज कोटी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मिटर बॅकस्ट्रोकमध्ये धवल हनमनावर, चिन्मय बागेवाडी, नीलकंठ इरकल यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये वरून धामणकर, चिन्मय बागेवाडी, निश्चित हुल्लुर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये आदी शिरसाठ,वेदांत पाटील, निश्चित हुल्लूर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये स्मरण मंगळूरकर, आदी शिरसाट, निश्चित हुल्लुर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 100 मीटर बटरफ्लायमध्ये स्वयम कारेकर, स्मरण मंगळूरकर, निश्चित हुल्लूर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मीटरमध्ये (आय एम) स्मरण मंगळूरकर, वेदांत पाटील, निश्चित हुल्लूर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या विभागात 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सामिया मेणसे, शर्मिष्ठा मालाई व जानवी पप्पू यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये सामिया मेणसे , सृष्टी कंगराळकर व जानवी पप्पू यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये भूमी भागवत, वैशाली घाटेगस्ती, विजयलक्ष्मी पुजारी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मीटर बॅकस्टोकमध्ये वैशाली घाटेगस्ति, भूमी भागवत व विजयलक्ष्मी पुजारी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये साक्षी शिरली, शर्मिष्ठा मालाइ व विजयलक्ष्मी पुजार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये साक्षी शिरली, शर्मिष्ठा मलाई व वैशाली घाटेगस्ती यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये शर्मिष्ठा मलाई , साक्षी शिरली व सामिया मेणसे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 100 मीटर बटरफ्लायमध्ये साक्षी शिरोली,सामिया मेणसे व प्राची कदम यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, 200 मीटर (आय एम) मध्ये साक्षी शिरोली,सामिया मेणसे व शर्मिष्ठा मलाई यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकाविला.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा व हिंद क्लबचे प्रशिक्षक संदीप मोहिते, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, विशाल वेसने, कलाप्पा पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, विजय नाईक, निखिल भेकने, प्रसाद दरवनदर, ओम घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article