Ad imageAd image

उचगावच्या श्री मळेकरणी देवीच्या यात्रेवर आगामी एक जून पासून बंदी : उद्या मंगळवारी 28 रोजी मंदिर परिसरात भरणार शेवटची यात्रा

Ravindra Jadhav
उचगावच्या श्री मळेकरणी देवीच्या यात्रेवर आगामी एक जून पासून बंदी : उद्या मंगळवारी 28 रोजी मंदिर परिसरात भरणार शेवटची यात्रा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : उचगावची ग्रामदैवता तसेच बेळगाव तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मळेकरणी देवीच्या यात्रेवर आगामी एक जून पासून बंदी घालण्यात येणार असून उद्या मंगळवारी 28 रोजी उचगाव श्री मळेकरणी देवीच्या मंदिर परिसरात शेवटची यात्रा भरणार आहे.

उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या यात्रेसाठी भाविकांची गर्दी असते. यामुळे या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. मान म्हणून देण्यात येणाऱ्या बकरी-कोंबड्यांचे अवयव, टाकाऊ गोष्टी यामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या उद्भवत आहेत. तसेच देवीला मान देण्यासाठी बळी दिल्या जाणाऱ्या पशुमुळे गावकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच जत्रेला जाणाऱ्या मद्यपिंकडून दारूच्या बाटल्या शेतात फेकणे, शेतशिवारात जेवणाच्या पंगती बसवून कचरा टाकणे यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे. यामुळे दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या मळेकरणी देवस्थान परिसरात होणाऱ्या यात्रेवर बंदी घालण्यात येत असून ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि मळेकरणी देवस्थान समितीच्यावतीने उचगाव गावातील मळेकरणी देवीच्या यात्रेवर बंदी घालण्याच्या ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
यापुढील काळात मंगळवारी आणि शुक्रवारी होणारी देवीची यात्रा आता उचगाव मध्ये होणार नाही. मात्र, श्री मळेकरणी देवीच्या नावाने दिला जाणारा मान आता केवळ गावातच नाही तर देवीचा अंगारा लावून कुठेही दिला जाऊ शकतो. कुणीही उचगाव गाव परिसरात यात्रा करू नये. आपापल्या घरी यात्रा कराव्ही अशी महत्वपूर्ण सूचना या बैठकीत करण्यात आली आहे.

या ग्रामसभेत ग्रा.पं.अध्यक्ष मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पंचायत विकास अधिकारी शिवाजी मडीवाल, श्री मळेकरणी देवस्थान कमिटीचे देसाई बंधू, पुंडलिक कदम, युवराज कदम, बी. एस. होनगेकर , एल.एस. होनगेकर, दीपक पावशे यासह गावातील पंच, ग्राम पंचायत सदस्य, युवक मंडळे, युवक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article