कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी बळवंत रामा शिंदोळकर तर सचिवपदी गुरुनाथ होसूरकर यांची निवड

Ravindra Jadhav
कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी बळवंत रामा शिंदोळकर तर सचिवपदी गुरुनाथ होसूरकर यांची निवड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 25 : कोनवाळ गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बळवंत रामा शिंदोळकर तर सचिव म्हणून गुरुनाथ होसूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

2024-25 सालाच्या नूतन कार्यकारिणी निवड बैठकीत ही निवड करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्षपदी केतन मिलिंद देसूरकर आणि गुरुराज चांदेकर यांची संयुक्त तसेच सहसचिवपदी उमेश लोहार, अनिकेत शिंदे, अभिषेक भागानगरे, पांडुरंग गवळी यांची संयुक्त निवड करण्यात आली. खजिनदारपदी निखिल देसूरकर तर उपखजिनदारपदी युवराज चव्हाण व ज्ञानेश्वर गवळी यांची संयुक्त निवड केली गेली.
तसेच अभिजित सुणगार, विनायक बेळगावकर, दत्ता पाटील, अनंत गवळी, प्रसाद कुडतरकर यांची हिशोब तपासणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article