‘ बालवीर ‘ चे वार्षिक स्नेहसंमेलन‎ : चिमुकल्यांच्या कलागुण सादरीकरणांनी भारावले पालक

Ravindra Jadhav
‘ बालवीर ‘ चे वार्षिक स्नेहसंमेलन‎ : चिमुकल्यांच्या कलागुण सादरीकरणांनी भारावले पालक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगुंदी ( तालुका – बेळगाव) येथील बालवीर विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन‎ नुकतेच झाले. स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुरडयांनी सादर केलेल्या‎ विविध कलागुणांना पालक व‎ प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.‎
चिमुकल्यांच्या कलागुण सादरीकरणांनी पालक अक्षरशः भारावले.

बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे‎ उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सांगाती पतसंस्था शिनोळीचे नितीन पाटील, उद्योगपती एस. आय. शहापूरकर, रेणुका शुगरचे गोविंद मिसाळे, बालवीर सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष शंकर चौगुले, सेक्रेटरी परशराम हदगल, बालवीर अर्बन सोसायटीचे चेअरमन आनंदा जाधव, व्हाईस चेअरमन राजू मुजावर, बालवीर महिला सोसायटीच्या चेअरपर्सन रिता बेळगावकर, व्हाईस चेरपर्सन रिता ढेकोळकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

प्रारंभी माध्यमिक विभागाचे माजी मुख्याध्यापिक के.डी.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. विद्यालयात वर्षभर‎ राबविण्यात आलेल्या विविध‎ उपक्रमांची, शालेय शिक्षण व खेळात चाललेली विद्यार्थ्यांची प्रगती यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, शेतकरी गीत, कोळी गीत, छत्रपती शिवरायांचा इतिहास असे विविध‎ कार्यक्रम सादर केले. एकापेक्षा एक‎ सरस गीते, नृत्य सादर‎ करून मुलांनी वाहवा मिळविली. यावेळी व्यसनमुक्तीवर‎ व मोबाईलाचा दूरुपयोग यावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात‎ आला.
सिद्धेश्वर तुर्केवाडकर व रश्मी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शैला कोळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला‎ बालवीर परिवार व संचालक मंडळ, शिक्षक, यांच्यासह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.‎

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article