Ad imageAd image

मास्टर आर्ट मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश

Ravindra Jadhav
मास्टर आर्ट मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी संपूर्ण भारतभर चित्रकला स्पर्धा , टी-शर्ट रंगविणे , चित्र काढून रंगविणे या स्पर्धा घेण्यात येतात . दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील बालिका आदर्श विद्यालयाच्या 431 विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेत इ . दहावीची विद्यार्थिनी कुमारी गिरीजा हलगेकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे .
त्याचबरोबर 53 विद्यार्थिनींनी सुवर्णपदके मिळविली आहेत . तर 16 विद्यार्थिनींना विशेष पारितोषिके मिळाली आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक श्री . एन्. ओ. डोणकरी यांना ‘ ग्लोबल आर्ट मुख्याध्यापक’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
या सर्व विद्यार्थिनींना शाळेचे चेअरमन श्री.  जी. एन. फडके यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक , सर्व शिक्षक वर्ग आणि चित्रकला शिक्षिका श्रीमती कविता चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article