सतीश शुगर क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उडपीची बाजी : विघ्नेश ठरला ‘ मिस्टर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘ किताबाचा मानकरी तर चरणराज उपविजेता : बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापूरे ‘ उत्कृष्ट पोझर ‘

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : अकराव्या सतीश शुगर क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उडपी जिल्ह्याने बाजी मारली. उडपीचा पिळदार शरीरयष्टीचा शरीरसौष्ठवपटू विघ्नेश हा ‘ मिस्टर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘ या मानाच्या किताबाचा मानकरी ठरला तर याच जिल्ह्यातील चरणराज याने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडवीत उप विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठपटूही आघाडीवर राहिला. बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापूरे याने या स्पर्धेत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तो स्पर्धेचा ‘ उत्कृष्ट पोझर ‘ किताबाचा मानकरी ठरला.

कर्नाटक राज्य शरीसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीसौष्ठव संघटना व गोकाक तालुका शरीसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयबीबीएफ, मुंबई यांच्या मान्यतेने 7 वजनी गटात चिकोडी येथील आरडी हायस्कूलच्या मैदानावर ही शरीसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मानाच्या ‘ मिस्टर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘ किताबासाठी मातब्बर शरीरसौष्ठवपटू संदेश कुमार, शशीधर नाईक, धीरज कुमार, विघ्नेश, वरून कुमार, प्रशांत ख न्नूकर आणि चरण राज यांच्यात लढत झाली. यामध्ये उडपीचे चरणराज आणि विघ्नेश आघाडीवर होते. यांच्यात पिळदार शरीरयष्टीचा जोरावर विघ्नेशने बाजी मारीत ‘ मिस्टर सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘ या मानाच्या किताबावर आपला हक्क सांगितला. चरणराजलाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

55 किलो वजनी गटात उडपीच्या संदेश कुमार याने पहिला तर बेळगावच्या गजानन गावडे यांने दुसरा क्रमांक मिळविला. उडपीचा कृष्णा प्रसाद तिसऱ्या क्रमांकावर, बेळगावचा उमेश गंगणे चौथ्या क्रमांकावर तर धारवाडचा विजय जडागौडार पाचव्या क्रमांकावर राहिला.
60 किलो वजनी गटात उडपीचा शशिधर नाईक पहिल्या क्रमांकावर, बेळगावचा विशाल निलजकर दुसऱ्या क्रमांकावर, उडपीचा सुमंथ तिसऱ्या क्रमांकावर, कारवारचा रोनाल्ड डिसोजा चौथ्या क्रमांकावर तर बेळगावचा उदय मुरकुंबी पाचव्या क्रमांकावर राहिला.
65 किलो वजनी गटात उडपी येथील धीरज कुमार याने पहिला तर अभिलाष याने दुसरा क्रमांक मिळविला. बेळगावचा बस्सापा कोणुकरी तिसऱ्या क्रमांकावर, धारवाडचा झाकीर हुल्लुर चौथ्या क्रमांकावर तर उडपीचा सोमशेखर कोरवी पाचव्या क्रमांकावर राहिला.
70 किलो वजनी गटात उडपीच्या विघ्नेश याने पहिला, शिमोगाच्या लोकेश पटेल यांने दुसरा, बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदार याने तिसरा, बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापुरे याने चौथा तर उडपीच्या आशिष याने पाचवा क्रमांक मिळविला.
75 किलो वजनी गटात दावणगिरी येथील वरून कुमार जीविके याने पहिला, बेळगावचा नागेंद्र मडिवाळ यांने दुसरा उडपीचा कुमारा यांने तिसरा क्रमांक मिळविला. बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर आणि राहुल कलाल यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला.
80 किलो वजनी गटात बेळगावचा प्रशांत खन्नूकर पहिला, दावणगिरीचा राहुल मेहरवाडे दुसरा, उडपीचा पवन तिसरा, म्हैसूरचा सत्यानंद भट चौथा तर मंगळूरचा अमर आर शेख पाचवा आला.
80 किलो वरील वजनी गटात उडपीचा चरणराज पहिला, कारवारचा अश्वत सुजाण हा दुसरा, धारवाडचा गिरीश मॅगेरी तिसरा, चित्रदुर्ग चा मोहम्मद नूरुल्ला चौथा तर बेळगावचा व्ही. बी. किरण हा पाचवा आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article