डॉ. सोनाली सरनोबत ‘ चाणक्य ‘ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Ravindra Jadhav
डॉ. सोनाली सरनोबत ‘ चाणक्य ‘ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : भारतीय जनसंपर्क परिषद (पीआरसीआय) ने येथील होमिओपॅथिक सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनाली सरनोबत यांना ‘ चाणक्य ‘ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मंगळूर येथील मोती महल कन्व्हेन्शन हॉलमध्ये नुकताच हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, जयराम (मुख्य मार्गदर्शक आणि अध्यक्ष एमेरिटस, पीआरसीआय), श्रीमती गीता शंकर (राष्ट्रीय अध्यक्ष व संचालक, गव्हर्निंग कौन्सिल पीआरसीआय) आणि सुश्री स्वीजल फुर्ताडो (मिस ग्लोबल इंडिया 2024) यांच्या हस्ते डॉ. सोनाली सरनोबत यांना हा राष्ट्रस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक सेवा आणि उद्योजकीय नेतृत्वातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. सोनाली सरनोबत यांना चाणक्य राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

यावेळी परिषदेने आपल्या जगाला आकार देणारी प्रमुख आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी विविध उद्योगांतील व्यावसायिक आणि विचारवंतांना एकत्र आणले होते. त्यामध्ये डॉ. सरनोबत यांनी ‘डिजिटल वेलबीइंग आणि डिजिटल आरोग्याच्या व्यवस्थापनातील महिला’ या विषयावरील पॅनल चर्चेत भाग घेतला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article