बेळगाव : कम्प्लीट कराटे अकॅडमी व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या 5 विद्यार्थ्यांना कराटे ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.
कॅम्प येथील शानभाग हॉल येथे कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 225 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी कराटेचा उत्कृष्ट सराव केलेल्या ओंकार पाटील, रितू पाटील, आदित्य काकतकर, समर्थ कल्लोरी व श्रेयस नाईक या टॉप पाच कराटे पटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.
या कराटे पटूंना बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे जितेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच त्यांच्या पालकांनाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
https://www.facebook.com/share/v/gtdNpVvyNJzL957F/?mibextid=oFDknk