अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे द्वि दशक पूर्ण : स्वतःच्या वास्तूत स्थलांतर : वैद्य रुपेश साळुंखे यांनी दिली माहिती

Ravindra Jadhav
अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे द्वि दशक पूर्ण : स्वतःच्या वास्तूत स्थलांतर : वैद्य रुपेश साळुंखे यांनी दिली माहिती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : आयुर्वेद ही जगण्याची एक पद्धत आहे. आयुर्वेद म्हणजे मनुष्य जीवनाचा वेद आणि सदृढ आरोग्याचा महामंत्र आहे. आयुर्वेद म्हणजे आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्याचं ज्ञान होय, असे अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे संचालक वैद्य रुपेश साळुंखे यांनी सांगितले.

अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरला 20 वर्षे पूर्ण होत असून सेंटरच्या 20 वर्षांच्या वैद्यकीय सेवा कार्याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वैद्य रुपेश साळुंखे बोलत होते.

अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरने आरोग्यसेवेचा तब्बल प्रवास पूर्ण केला आहेच. याशिवाय ‘अत्रिवरद’ आता स्वतःच्या वास्तूत स्थलांतरित झाले आहे ही आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच ‘ अत्रिवरद ‘ च्या आरोग्य सेवेची दखल घेत ‘ 12 th Media Pvt. Ltd. ‘ या संस्थेने आपल्याला ‘ बेस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर ‘ हा पुरस्कार जाहीर केल्याची गोड बातमीही अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे संचालक वैद्य रुपेश साळुंखे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

धन्वंतरी जयंतीदिनी अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरच्यावतीने धन्वंतरी पूजा आणि याग केला जातो. याबद्दल माहिती देताना वैद्य रुपेश साळुंखे म्हणाले,
” अमृत मंथनातून जी 14 रत्ने मिळाली त्यापैकी धन्वंतरी हे एक रत्न होय. धन्वंतरी हे विश्वातील चिकित्सकांचे आराध्य दैवत आहे. तर्पण, मार्जन हे कर्मकांड आहे. त्यामुळे भक्ती वाढते आणि भक्तीमुळे श्रद्धा व शक्ती वाढते. यासाठी धन्वंतरी जयंतीदिनी याग करावा. भगवतांला आहुत्या द्याव्यात. परमेश्वराला आवाहन करावे. यामुळे आरोग्यहीत जपलं जातं. आरोग्य देवतेचे जागरण झाल्याने विश्वातील व्याधी नष्ट होतात आणि विश्व आरोग्य अबाधित राहतं “ .

आयुर्वेद ही सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. कसं जगावं हे आयुर्वेद सांगत. विकृत जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या विविध आजारातून आयुर्वेद मनुष्याला रोगमुक्त करतं. नवचैतन्य देतं, असेही वैद्य रुपेश साळुंखे यावेळी बोलताना सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article