बेळगाव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे शिवम वराळे, तानी बेळगांवकर तसेच देवेंद्र जीनगौडा शाळेचा मनोज मोदगेकर हे कराटेपटू 35 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी रवाना झाले.
सदर स्पर्धा 17 व 18 ऑक्टोबर दरम्यान सरस्वती विद्यालय मुखर्जीनगर, देवास, मध्यप्रदेश येथे ही अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार आहे.
हे खेळाडू क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी व कराटे प्रशिक्षक हरीश सोनार यांच्या समवेत रवाना झाले आहेत.
या स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आगामी होणाऱ्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. वरील खेळाडूंना संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.