Ad imageAd image

राष्ट्रीय विद्याभारती ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीराचे खेळाडू रवाना

Ravindra Jadhav
राष्ट्रीय विद्याभारती ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीराचे खेळाडू रवाना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव : मध्यप्रदेशमधील सतना येथे होणाऱ्या 35 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे समीक्षा विनायक बुद्रुक, नताशा महादेव चंदगडकर ,भावना भाऊ बेर्डे हे ॲथलेटिक्स खेळाडू क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट यांच्यासह रवाना झाले आहेत.

विजयवाडा आंध्रप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती क्षेत्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत समीक्षा बुद्रुक हिने 3000 मीटर धावणे व 100 व 400 मीटर रिले प्रकारात तीन सुवर्णपदके पटकाविली आहेत. नताशा चंदगडकर हिने लांबउडी तिहेरी उडी व 100 मीटर रिले प्रकारात 3 सुवर्णपदक पटकाविली तर प्राथमिक मुलींच्या गटात भावना बेर्डे हिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक, 100 मीटर रिले प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या खेळाडूंना शाळेच्या क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील, अनुराधा पुरी, चंद्रकांत पाटील, यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article