तारांगण व फॅशन ट्रेंड्स तर्फे कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन : सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

Ravindra Jadhav
तारांगण व फॅशन ट्रेंड्स तर्फे कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन : सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या तारांगण व फॅशनच्या दुनियेतील नावलौकिक फॅशन ट्रेंड्स या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कार हा फॅशन शो व व महिलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार दिनांक 2 जून दुपारी 2 ते 7 यावेळेत खानापूर रोडवरील महावीर भवन येथे होणार आहे.

फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये नवोदितांना आपली कला सादर करण्याची संधी या कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नवोदित फॅशन डिझायनरनी तयार केलेल्या पोशाखाचा फॅशन शो होणार आहे. फॅशन शो सोबतच महिलांचे डान्स, गायन ,वादन , गेम शो चे आयोजन केले आहे.
तसेच या कार्यक्रमात बेनकनहळी ग्रामपंचायतचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व बेळगावच्या जनतेला पाणीपुरवठा करणारे सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांचा सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दडपण चित्रपटातील प्रमुख भूमिका करणारे शशिकांत नाईक, स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, महावीर भवन चे विश्वस्त राम कस्तुरे, रमेश चिवटे, विजय खटावकर, विश्वास मानकर उपस्थित राहणार आहेत, असे फॅशन ट्रेंड्सच्या संचालिका स्वाती खटावकर यांनी कळविले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article