Ad imageAd image

अर्जुन जाधव लिखीत ‘प्रेयसी एक आठवण’ कादंबरीला मिळाला राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार

Ravindra Jadhav
अर्जुन जाधव लिखीत ‘प्रेयसी एक आठवण’ कादंबरीला मिळाला राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : जागर , बेळगाव कुणाच्या बापाचं, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, बागलकोटची सुगंधा, लेक जगवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्ती अशा दर्जेदार साहित्य कृती साकारणाऱ्या बेळगावचे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या ‘प्रेयसी एक आठवण ..’ या कादंबरीला
‘ पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार 2024 ‘ हा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कराड येथे पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद याच्यावतीने भरविण्यात आलेल्या एक दिवशीय मराठी साहित्य संमेलनात अर्जुन जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या साहित्यकृतीला मिळालेला आतापर्यंतचा हा नववा राज्यस्तरीय वाड्:मय पुरस्कार आहे.
लवकरच त्यांची केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल योजनेवर आणि घरकुल घोटाळयावर प्रकाशझोत टाकणारी ‘ग्रामपंचायत एक वाटणीदार अनेक..’ ही नवी कादंबरी प्रसिद्ध होत आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राजदूत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व प्रसिद्ध लेखक डाॅ. ज्ञानेश्वर मुळे, प्रसिद्ध इतिहासक डाॅ. विनायक जाधव, संमेलनाचे आयोजक सिध्दार्थ पाटील, लीना पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील साहित्यिक व उत्कृष्ट साहित्यकृतीचा पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article