बेळगावच्या अनुष्काला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य

Ravindra Jadhav
बेळगावच्या अनुष्काला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक पटकाविले. तिला ज्येष्ठ रंगकर्मी वासुदेव विष्णुपुरीकर यांच्या हस्ते पदक, सन्मान पत्र आणि रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा समारंभ मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि सदा सरवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात अनुष्का आपटे हिला बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरच्या केशवराव भोसले सभागृहात पार पडली. या फेरीत बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने भरत नाट्यम् संशोधन मंदिर, पुणे यांच्या तर्फे बसवण्यात आलेल्या ‘ संगीत लावणी भुलली अभंगाला ‘ या नाट्यात’ गंगेची भूमिका वटविली होती. गंगा या भूमिकेसाठी अनुष्का आपटे हिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक मिळाले.
नाटकात गाणे म्हणत नृत्य करणे अवघड असते. पण अनुष्का हिने हे सहजपणे निभावले.

अनुष्काला लहानपणापासूनच नाटकाची आवड आहे. सुनीताताई पाटणकर आणि मेधाताई मराठेंच्या नाट्य शिबिरांमध्ये तिला अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले आहे.
मेधा मराठेंच्या दिग्दर्शनाखाली अनुष्काने संगीत सौभद्र, संगीत शारदा आणि संगीत स्वयंवर मध्ये प्रमुख भूमिका वटविल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article