आमदार अभय पाटील यांच्यावर सोपविली गेलीय आणखीन एक महत्त्वपूर्ण जबाबदारी

Ravindra Jadhav
आमदार अभय पाटील यांच्यावर सोपविली गेलीय आणखीन एक महत्त्वपूर्ण जबाबदारी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 15 ( प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्याचे प्रभारी आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून उत्कृष्टरित्या जबाबदारी पार पाडणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यावर आता पक्षाने आणखीन एक महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 25 नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून आमदार अभय पाटील यांच्यावर आता कोल्हापूर जिल्ह्याचे प्रवासी प्रभारी म्हणून 10 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप अध्यक्ष श्री.जे.पी.नड्डा यांनी आमदार अभय पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या जबाबदारी अंतर्गत आमदार अभय पाटील हे नजीकच्या चंदगडसह राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या मतदारसंघाचे प्रवासी प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article