अंगणवाडी कर्मचारी छेडणार आंदोलन ..!

Ravindra Jadhav
अंगणवाडी कर्मचारी छेडणार आंदोलन ..!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मंगळवार दि.17 डिसेंबर 2024 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन छेडण्यात येणार आहे. सीईटूच्या राज्याध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

राज्य- केंद्र सरकारांनी अर्थसंकल्पात वेतन वाढवताना किमान वेतन 26,000 लागू करावे, 2023 च्या आदेशानुसार ताबडतोब ग्रॅच्युइटीचे पैसे अदा करावेत तसेच ग्रॅच्युइटी सर्वांना लागू करावी, गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना श्रेणी 3 आणि 4 चे कर्मचारी मानून त्यांना नोकरीत कायम करावे, यासह एकूण 26 विविध मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर अंगणवाडी सेविकां आंदोलन छेडणार आहेत, असे एस. वरलक्ष्मी यांनी सांगितले.

याप्रसंगी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष दोडप्पा पुजारी सरचिटणीस जे एम जैनेखान, सचिव गोदावरी, सहसचिव मंदा नेवगी, खजिनदार चन्नम्मा गडकरी उपाध्यक्ष सी. एच. मगदूम, सरस्वती माळशेट्टी आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article