……आणि संतप्त विद्यार्थ्यांनी उगारले आंदोलनाचे हत्यार

Ravindra Jadhav
……आणि संतप्त विद्यार्थ्यांनी उगारले आंदोलनाचे हत्यार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 17 ( प्रतिनिधी) : प्रभूनगर ( खानापूर ) येथे परिवहन मंडळाची बस गाडी नियमितपणे थांबवावी, अशी मागणी करीत या भागातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज शनिवारी आंदोलन छेडले.

आज परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना शाळा- कॉलेजला पोहोचण्याची घाई होती. परंतु सकाळपासून एकही बस थांबली नाही. एकही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आणि रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बस विद्यार्थ्यांनी अडविल्या.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बेळगावकडे जाणाऱ्या अनेक बस काही काळ थांबून होत्या. त्यामुळे चक्का जाम होऊन बराच गोंधळ उडाला. अखेर परिवहन महामंडळ, खानापूर आगाराचे व्यवस्थापक संतोष बेनकनकोप्प व खानापूर पोलिसांनी जाऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. तसेच नियमित बस थांबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बस पूर्ववत सुरू झाली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article