आनंदवाडी आखाड्यात जानेवारीत रंगणार दंगल : करण्यात आले प्रसिद्ध पत्रकाचे अनावरण

Ravindra Jadhav
आनंदवाडी आखाड्यात जानेवारीत रंगणार दंगल : करण्यात आले प्रसिद्ध पत्रकाचे अनावरण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगावच्या आनंदवाडी कुस्ती आखाड्यात दिनांक ५ जानेवारी रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे.
बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने भरविण्यात येणाऱ्या या दंगलीच्या प्रसिद्ध पत्रकाचे अनावरण रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पहिल्या क्रमांकाची कुस्ती पै. प्रकाश इंगळगी कर्नाटक चॅम्पियन विरुद्ध पै. प्रेम जाधव युनिव्हर्सिटी ब्ल्यू लहान कंग्राळी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील विरुध्द रुद्राप्पा येमेटी, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सुनील मैत्री विरुद्ध निखिल पाटील यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक चटकदार प्रेक्षणीय कुस्त्या पाहण्याची संधी बेळगाव आणि परिसरातील कुस्ती शौकिनांना लाभणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी, कुस्ती मैदानाचे प्रमुख देणगीदार गोविंद टक्केकर, हिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक अनंत जांगळे, संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतन सिंग पनवार, कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत, सेक्रेटरी संतोष होंगल, तांत्रिक कमिटीचे अध्यक्ष पै. अतुल शिरोळे, अशोक हलगेकर, माजी प्राध्यापक सुरेंद्र देसाई, संजय चौगुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी नवोदित मल्ल यावेळी उपस्थित होते.

 या कुस्ती दंगली बाबत उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. कुस्ती दंगल यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या दिलेल्या जबाबदारीनुसार कामे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सुरेंद्र देसाई यांनी कुस्ती दंगलीसाठी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली. गोविंद टक्केकर यांनी गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीच्या कुस्ती दंगलीला ही भरीव आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article