Ad imageAd image

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : नाथ पै चौकात साजरा केला गेला आनंदोत्सव

Ravindra Jadhav
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : नाथ पै चौकात साजरा केला गेला आनंदोत्सव
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव -” मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे . गेल्या 13 वर्षापासून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित . त्यासाठी लढा द्यावा . अनेक संघटनांनी तसेच साहित्य संमेलने यातून ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावे लागले मराठी भाषेला दर्जा मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद पसरला . केंद्र सरकारने अशाच प्रकारे 70 वर्षापासून प्रलंबित असलेला आमचा सीमा प्रश्न सोडवून आमचे स्वप्न साकार करावे ” विचार मा जी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी बोलताना व्यक्त केले .

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद नारायणराव जाधव सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी सकाळी साजरा करण्यात . त्याप्रसंगी ते बोलत होते शहापूर येथील नाथ पै चौकात या ट्रस्टच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात .
याप्रसंगी बोलताना अनंत लाड यांनी आनंद व्यक्त केला आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अभिजीत दर्जाचे महत्व असल्याचे मत अधोरेखित केले.
नगरसेवक नितीन जाधव यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले .प्रकाश मरगाळे म्हणाले की ,मराठी भाषेचा दर्जा बेळगाव भागात कायमच टिकून आहे. मराठी भाषेचे आपण संवर्धन करीत आहोतच .केंद्र सरकारने आमच्या सीमा प्रश्नात लक्ष घालून आमची मागणी पूर्ण .करावी.असे सांगितले तर शुभम शेळके यांनीही केंद्र सरकारने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले तर बापू जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सर्वश्री सुरज लाड सुरज कडोलकर ,दिलीप दळवी ,शिवाजी हावळानाचे, गणपत बैलूरकर, मोरेश्वर नागोजीचे ,दत्ता आजरेकर अशोक चिंडक ;सुरेश पाटील ; युवराज जाधव ;विजय जाधव, सुरेश धामनेकर, प्रभाकर भाकोजी, शाहु शिंदे व दिलीप बैलूरकर, राजाराम सूर्यवंशी, हिरालाल चव्हाण, शिवकुमार मनवाडकर , राजू पाटील आणि सौ वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article