त्या चर्मकार विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचा आंदोलनाचा इशारा

Ravindra Jadhav
त्या चर्मकार विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचा आंदोलनाचा इशारा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी बस स्थानकावर जवळील 23 चर्मकार दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोणतीही पूर्व सूचना न देता 23 चर्मकार दुकाने काढून टाकण्यात आली आहेत. त्या चर्मकार विस्थापितांचे पुनर्वसन करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या वतीने देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक विभागीय आयुक्तांना महासभेच्या वतीने सदर निवेदन देण्यात आले आहे.
विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी बस स्थानकाजवळ गेल्या 65 वर्षांपासून चर्मकारांची दुकाने होती. कोणतीही पूर्व सूचना न देता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ती दुकाने काढून टाकण्यात आली. तहसीलदार आणि नगरपालिकेने केलेली ही कारवाई बेकायदेशीर आहे. अशा प्रकारची कारवाई करताना पंधरा दिवस अगोदर पूर्व सूचना देणे गरजेचे होते. मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या गरीब चर्मकारांची दुकाने काढून टाकण्यात आली. यामुळे त्या गरीब चर्मकारांवर संकट कोसळले आहे.याचा गंभीरपणे विचार करून शासनाने त्या विस्थापितांचे पुनर्वसन करावे. त्यांना योग्य त्या प्रकारची मदत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार, हिरालाल चव्हाण, संजीव लोकापूर, गणेश काळे, शिवराज सौदागर, संजय चौगुले आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article