Ad imageAd image

आदित्य अमृत बिर्जेने पटकाविली 9 सुवर्णासह तब्बल 11 पदके : ठरला वैयक्तिक चॅम्पियनशिप पदाचा मानकरी : झाली राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Ravindra Jadhav
आदित्य अमृत बिर्जेने पटकाविली 9 सुवर्णासह तब्बल 11 पदके : ठरला वैयक्तिक चॅम्पियनशिप पदाचा मानकरी : झाली राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील जैन महाविद्यालयाचा वाणिज्य विभागाचा विद्यार्थी आदित्य अमृत बिर्जे याने विजापूर येथे झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा जलतरण स्पर्धमध्ये 9 सुवर्ण पदके आणि 2 रौप्य पदके अशी एकूण 11 पदके पटकावली असून तो वैयक्तिक चॅम्पियनशिप पदाचा मानकरी ठरला आहे.

आदित्य बिर्जे याने 200 मी. फ्री स्टाईल, 200 मी. बेस्टस्ट्रोक, 50 मी. बँकस्ट्रोक, 200 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. फ्रीस्टाईल, 100 मी. बॅकस्ट्रोक, 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 400 मी. फ्रीस्टाईल आणि 200 मी. बॅकस्ट्रोक या क्रीडा प्रकारात आदित्य अमृत बिर्जे याने सुवर्णपदके पटकाविली आहेत.
याशिवाय 50 मी. बटरफ्लाय, 50 मी. फ्रीस्टाईल या प्रकारात त्याने रौप्यपदकेही मिळविली.
तब्बल 11 पदकं मिळविणाऱ्या आदित्यला वैयक्तिक चम्पियनशिपची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.

या घवघवीत यशानंतर आता चेन्नईत होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड 200 मी. बँकस्ट्रोक , 100 मी. बॅकस्ट्रोक या प्रकारासाठी करण्यात आली आहे.

आदित्य बिर्जे हा जैन महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, नितीश अजिंक्य मेंडके यांचे मार्गदर्शन तर जैन महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील देसाई यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article