सबळ पुराव्याचा अभाव आणि साक्षीदारांतील विसंगतीमुळे दोघांची निर्दोष मुक्तता

Ravindra Jadhav
सबळ पुराव्याचा अभाव आणि साक्षीदारांतील विसंगतीमुळे दोघांची निर्दोष मुक्तता
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सबळ पुराव्या अभावी व साक्षीदारांतील विसंगतीमुळे बेळगाव तालुक्यातील नंदीहळ्ळी येथील दोघां जणांची बेकायदेशीर मद्य विक्री आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

संतोष रायाप्पा चौगुले ( वय 24, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव) व रायाप्पा शिवाजी चौगुले (वय 50, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव) अशी अबकारी खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीवरून अबकारी विभागाच्या पथकाने मार्च 2019 मध्ये नंदीहळ्ळी गावातील शिवाजीनगर येथील रहिवाशी संतोष रायाप्पा चौगुले यांच्या घरावर छापा टाकून घराची झाडाझडती घेतली होती. यावेळी अबकारी पोलिसांना स्वयंपाक घरात डायनिंग टेबलच्या खाली दडवून ठेवलेली गोवा बनावटीच्या 21 लिटर दारू च्या बाटल्या तसेच 24 लिटर बिअर बाटल्या आढळल्या होत्या. या प्रकरणी अबकारी विभागाने संतोष रायाप्पा चौगुले व रायाप्पा शिवाजी चौगुले यांच्यावर अबकारी कायदा 1965 कलम 13 अ, 14, 15 32 (1) 34,38 (1) व 43 (2) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या खटल्याची सुनावणी तिसऱ्या जे.एम. एफ. सी न्यायालयात झाली. सबळ पुराव्या अभावी व साक्षीदारांतील विसंगतीमुळे न्यायाधीशांनी वरील आरोपींची आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने वकील मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article