कृष्णात खोत यांना आचार्य अत्रे पुरस्कार : उद्या होणार वितरण सोहळा

Ravindra Jadhav
कृष्णात खोत यांना आचार्य अत्रे पुरस्कार : उद्या होणार वितरण सोहळा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 12 ( प्रतिनिधी) :
सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार यावर्षी कोल्हापूर येथील साहित्यिक प्राध्यापक कृष्णात खोत यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण उद्या मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे जन्मदिनी मराठा मंदिर सभागृह, खानापूर रोड ( रेल्वे ओव्हर ब्रिज नजीक), बेळगाव येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान ‘ आजच्या काळातील लेखकाची भूमिका ‘ या विषयावर कृष्णात खोत यांचे व्याख्यान होणार आहे.

वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत, उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड, कार्यवाह लता पाटील, सहकार्यवाह रघुनाथ बांडगी आणि कार्यकारी मंडळाने ही माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article