70 टक्के गुडघेदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही : डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची माहिती

Ravindra Jadhav
70 टक्के गुडघेदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही : डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची माहिती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : 70 टक्के गुडघेदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही. शिवाय पाठदुखीसाठी सुद्धा केवळ 5 टक्के रुग्णांनाच सर्जरीची गरज असते, अशी माहिती डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.

‘मानवी शरीरातील सांध्याची प्रतिबंधात्मक काळजी व त्यावरील अत्याधुनिक उपचार ‘ या विषयावर पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या टीम मधील डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे टिळकवाडी येथील वरेरकर नाट्यगृहात मार्गदर्शनपर व्याख्यान झाले . यावेळी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी वरील माहिती दिली. व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री .जगदीश कुंटे होते .

परमेश्वराने मानवाला दोन पायावर चालण्याचे वरदान दिले. मानवी शरीरातील मनक्याची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली असून दोन मणक्याच्या मधे असणारी चकती ही गाडीप्रमाणे आघात सहन करत असते पण बैठे काम, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, चुकीच्या पद्धतीने बसण्याची सवय, दुचाकी प्रवास याचा परिमाण स्लिप डिस्क सारख्या व्याधीत होतो. उतारवयातील हाडे ठिसूळ होऊनही मणक्यांचे विकार होतात. पण सुरुवातीच्या टप्प्यात जर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला तर काही औषधोपचार व व्यायाम यांनी हे आजार आटोक्यात ठेवता येतात. आजार बळावला तर शस्त्रक्रियेचाही उपाय असतो. आजकाल या सर्जरी दुर्भिणीद्वारे लेसरच्या साहाय्याने करता येतात. ज्यामध्ये सर्जरीनंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून चालता येते, असे डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले.
हात पायामध्ये वेदना, मुंग्या येणे, ताकद कमी होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहन त्यांनी केले.

उतारवयातील गुडघेदुखी ही हाडवरील कुर्चेचे आवरण तसेच गादी खराब झाल्यामुळे असते. सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचार तसेच वंगणयुक्त इंजेक्शन, तसेच कुर्चेची झीज कमी होण्याचा वेग कमी करण्यासाठी देण्यात येणारी पीआरपी इंजेक्शन थेरपीचाही उपयोग होतो असेही डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले.
झीज अंतिम टप्प्यात असेल तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नसतो. परंतु शस्त्रक्रियेतही आमूलाग्र बदल झाले असून आज डॉक्टरांच्या प्रयत्नांनी रोबोटिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येत असून यामुळे शस्त्रक्रियेत कमालीची अचूकता येते. शिवाय रुग्ण दुसऱ्याच दिवशी चालू लागतो, जिने चढता येतात, शस्त्रक्रियोत्तर हालचालीत ही नैसर्गिकता येऊन चालणे, मांडी घालणे, प्रवास करणे, वाहन चालविणे, पोहणे, ट्रेकिंग करणे अशा अनेक गोष्टी करता येणे शक्य झाले आहे, अशी माहितीही डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.
खुबा तसेच फ्रोज़न शोल्डर वरील उपचाराविषयी सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली.
पाठदुखी साठी सुद्धा आता केवळ 5 टक्के रुग्णांना सर्जरीची गरज असते, असेही ते म्हणाले.

डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातकोणत्याही व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक असते. आपण दुखणे अंगावर काढतो , ते बळावते अगदी चालणेही मुश्किल होते. मग भीती वाटते. पण घाबरून न जाता तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा असे जगदीश कुंटे यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमासाठी श्री. विलास अध्यापक यांचे सहकार्य लाभले तर भालचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article