विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरची धडक बसून मृत्यू

Ravindra Jadhav
विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरची धडक बसून मृत्यू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 18 ( bn7 news) : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरची धडक बसून एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे.
आज आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बेळगाव कपिलेश्वर उड्डाणपूलावर ही घटना घडली.

सदानंद बी. चव्हाण -पाटील (वय 48 मूळचे पाटील गल्ली, बेळगाव, सध्या राहणार सुळगे-येळ्ळूर) असे ट्रॅक्टरची धडक बसून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून यावेळी तेग्गीन गल्ली, वडगाव येथील विजय राजागोळ ही 56 वर्षीय व्यक्तीही ट्रॅक्टरही ठोकर बसून किरकोळ जखमी झाली आहे.

काल मंगळवार सायंकाळपासून श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक सुरू असून आज श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपिलेश्वर उड्डाण पुलाच्या उतारावर ट्रॉलीमधून बाप्पाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर वेगाने पुढे गेली आणि मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी  आलेल्या सदानंद बी. चव्हाण -पाटील याला ट्रॅक्टरची धडक बसली. ट्रॅक्टरची धडक बसताच सदानंद हा थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला आणि ट्रॅक्टरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र काहीच उपयोग झाला नाही आणि त्याची प्राणज्योत मालवली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article