नदीत उडी घेऊन संपविला जीव : वर्षभरापूर्वी पत्नीनेही केली होती आत्महत्या ..!

Ravindra Jadhav
नदीत उडी घेऊन संपविला जीव : वर्षभरापूर्वी पत्नीनेही केली होती आत्महत्या ..!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 14 ( प्रतिनिधी) : मलप्रभा नदीत उडी घेऊन 65 वर्षीय इसमाने आत्महत्या केली आहे. जिवाजी वसंत बिडकर ( राहणार – बीडी, तालुका- खानापूर) असे नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जिवाजी बिडकर हे वनखात्यात वॉचमन म्हणून काम करत होते. मागील वर्षी त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केली होती. पत्नीने आत्महत्या केल्याच्या मनस्तापाने खचून जीवजीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

जिवाजीने बुधवारी दि.14 रोजी सायंकाळी खिशातील आधारकार्ड नदी काठाजवळील जॅकवेल जवळ ठेऊन नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article