माध्यम प्रतिनिधींचे दीर्घकाळाचे स्वप्न होणार साकार : बेळगाव नगरीत उभारण्यात येणार सुसज्ज पत्रकार भवन

Ravindra Jadhav
माध्यम प्रतिनिधींचे दीर्घकाळाचे स्वप्न होणार साकार : बेळगाव नगरीत उभारण्यात येणार सुसज्ज पत्रकार भवन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : माध्यम प्रतिनिधींचे दीर्घकाळाचे स्वप्न साकार होणार आहे. विश्वेश्वरय्या नगर येथे पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली असून याजागी लवकरच सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यात येणार आहे.

पत्रकार भवन इमारतीची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, फलोत्पादन विभागाचे मंत्री एस.एस. मल्लिकार्जुन, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, कित्तूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्ती विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वास वैद्य, उद्यान विभागाच्या सचिव डॉ. शामला इक्बाल, उद्यान विभागाचे संचालक डी.एस. रमेश, महापौर सविता कांबळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहसंचालक मंजुनाथ डोलिना, वरिष्ठ सहायक संचालक जडियप्पा गेडलगट्टी, उद्यान विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी उपस्थित होते.

पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी देऊन सुसज्ज प्रेस बांधण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. पत्रकार भवनाच्या पायाभरणीने माध्यम प्रतिनिधींचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होत असल्याचे कडबुर म्हणाले.

पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणारे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन तसेच जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचा जिल्हा कार्यरत पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला बेळगावमधील पत्रकार उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article