‘मातृभाषेच्या शाळा टिकवा अभियान’ जागृतीसंदर्भात विश्वभारती कला-क्रीडा संघटनेची रविवारी होणार सभा

Ravindra Jadhav
‘मातृभाषेच्या शाळा टिकवा अभियान’ जागृतीसंदर्भात विश्वभारती कला-क्रीडा संघटनेची रविवारी होणार सभा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर ( bn7news) : खानापूर तालुक्यातील मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मातृभाषेच्या शाळा टिकवा अभियान’ जागृतीसंदर्भात विश्व भारती कला क्रीडा संघटनेतर्फे रविवार दि. 22 रोजी खानापूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेत मातृभाषेच्या शाळा टिकवा अभियान’ जागृतीसंदर्भात विचारविनिमय केला जाणार असून मातृभाषेच्या शाळेत कार्यरत असलेल्या आदर्श शिक्षकांची संघटनेमार्फत निवड करण्यात आली असून यावेळी आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासून शिक्षणाबरोबरच अभ्यास, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये, योग व कलेची आवड निर्माण करण्यासाठी संघटनेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच आपली संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा सरकारी शाळा टिकविली पाहिजे म्हणून संघटना गेल्या दोन- चार वर्षांपासून कार्यरत आहे.

बैठकीला बेळगाव व खानापूर तालुक्यातील मातृभाषा शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वभारती कला-क्रीडा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article